उकाड्यावर “अवकाळी’ची फुंकर

शहर, उपनगरालाही पावसाने झोडपले : दिवसभर ढगाळ वातावरण

प्रभात वृत्तसेवा
पुणे,दि.17 – गेले दोन ते तीन दिवसांपासून राज्याभरात होणाऱ्या अवकाळी पावसाने मंगळवारी पुणे शहरासह जिल्ह्यात हजेरी लावली. पुणे शहरात तब्बल एक तास वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. गेले अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना मात्र या एक तासाच्या वादळी पावसाने थोडासा दिलासा मिळाला.

-Ads-

गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस, गारपीट होत आहे. मात्र, पुणे शहर आणि जिल्ह्यात मात्र पावसाने हजेरी लावली नव्हती. उलट तापमान वाढल्याने उकाडा प्रचंड जाणवत होता. यामुळे त्रस्त पुणेकरांना थोडासा दिलासा आजच्या पावसामुळे मिळाला. मंगळवारी सकाळपासून कडक ऊन पडले असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि पावसाला सुरूवात झाली. ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळत होत्या.

कात्रज, सिंहगड रोडवर जोरदार
शहरात मध्यवस्तीपेक्षा उपनगरांत चांगला पाऊस झाला. कात्रज परिसरात वादळी वाऱ्यांमुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही कोसळल्या. त्याचबरोबर रस्त्यावर माती आणि कचरा मोठ्या प्रमाणावर उडून येत होता. साधारणत: चारच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर हा पाऊस तब्बल एक तास सुरू होता. सिंहगड रोडवरसुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे सखल भागात पाणी साचले. मांजरी, हडपसर, फुरसुंगी भागात सुद्धा चांगला पाऊस झाला. उपनगरातील विविध भागात साधारणत: अर्धा ते पाऊण तास हा पाऊस पडत होता.

जिल्ह्यात ठिकठिकाणी दमदार
बारामतीपासून आंबेगाव तालुक्‍यापर्यत अनेक भागात जोरदार पाऊस झाला. जुन्नर तालुक्‍यातील पिंपरी पेंढार येथे गारांचा पाऊस झाला. तब्बल अर्धा तास या गारांनी झोडपून काढले. या यात शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होण्याची शक्‍यता आहे. जुन्नर आणि अहमदनगर भागात मोठ्या प्रमाणात कांदा आणि टोमॅटो तोडणीस आली आहेत. पण, गारांच्या पावसामुळे याचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. कोकणातत आंबा पीक मात्र धोक्‍यात आले आहे.

पुढील दोन दिवस पावसाचे
उत्तर मध्य महाराष्ट्रापासून तमिळनाडूपर्यंत असलेली खंडित वाऱ्यांची स्थिती पावसाला पोषक ठरत असून, दोन दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. पहाटे सुटणारी गार हवा, सकाळपासून वाढणारा उन्हाचा चटका, दुपारनंतर गोळा होणारे ढग आणि पाठोपाठ ढगांचा गडगटाट, विजा आणि गारपिटीसह होणारा पाऊस अशीच स्थिती राज्याच्या विविध भागांत दिसून येत आहे. तर उन्हाचा चटकाही कायम असल्याने काही भागातील तापमानाचा पारा सुद्धा सरासरीपेक्षा एक ते दोन अंशाने जास्त आहे. मंगळवारी सर्वाधिक तापमान हे चंद्रपूरमध्ये 43.5 अंश सेल्सिअस नोंदिवले गेले.

 

पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता
राज्यात अवकाळी पावसाची ही स्थिती आणखी दोन दिवस राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.येत्या 24 तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. पुणे शहरात येत्या चोवीस तासांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)