उकाड्याने त्रस्त पुणेकरांवर पावसाची फुंकर

संग्रहित छायाचित्र

पुणे – गेल्या पंधरवड्यापासून उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना मंगळवारी सायंकाळी मात्र मुसळधार पावसाने दिलासा दिला. तब्बल अर्धा तास मेघगर्जनेसह हा पाऊस बरसत होता.

शहरात गेले काही दिवसांपासून सकाळी उकाडा आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण असे चित्र आहे. राज्यात विविध भागात पाऊस पडत असताना पुण्यात मात्र फक्त ढगाळ वातावरण होते. पण, मंगळवारी दुपारनंतर ढग जमू लागले होते. गडगडाट सुरू होता पण पाऊस पडत नव्हता. अखेर सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वारा वाहू लागला आणि पावसाला सुरूवात झाली. यामुळे काही क्षणात रस्त्यावरुन पाण्याचे पाट वाहू लागले, तर नागरिकांची तारांबळ उडाली. अनेकजण वाहने रस्त्याच्या कडेला लावत पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. या स्वारगेट, कर्वेनगर, सिंहगड रोड तसेच शहराच्या मध्यवस्तीतील सखल भागात या पावसाने पाणी साचले होते.

-Ads-

सध्या मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे. अजून महाराष्ट्रातून मान्सून परतला नसला, तरी येत्या दोन ते तीन दिवसांत तो माघारी फिरेल. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आगामी दोन दिवस पुण्यात ढगाळ वातावरण राहील, तसेच काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. राज्यात सुद्धा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)