उकाड्याचा त्रास आणखी तीन दिवस राहणार

पुणे- मार्चच्या अखेरच्या टप्यात तापमानाचा पारा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी तापमान हे चाळीस अंशाच्या आसपास पोहचले आहे, तर पुण्यातही मंगळवारी यंदाच्या मोसमातील सर्वाधिक म्हणजे 38.7 सेल्सिअस अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात सध्या सर्वत्र सूर्य आग ओकत आहे.त्याचबरोबर आर्द्रता वाढल्याने घामघूम होत आहे.

उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने अतिऊष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस शहरातील तापमानात वाढ होणार असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने वर्तविले आहे. त्याचबरोबर मार्च महिन्याच्या ठेवण्याच्या आठवड्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असल्याचे निरीक्षण ही हवामान खात्याने नोंदविले आहे. येत्या शनिवारी व रविवारी पूर्व विदर्भात उष्णतेची लाट येणार आहे. पुणे शहरातही गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचे चटके चांगलेच जाणवत आहेत. रात्रीसुद्धा किमान तापमानात फारशी घट होत नसल्याने उकाडा जाणवत आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी सुद्धा हवेत गारवा जाणवत नाही.

पुणे परिसरात मागील आठवडयात अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे कमाल तापमानात घट झाली होती. रात्री आणि पहाटे थंडी पडत होती. सध्या मात्र पुणेकरांना रात्रीच्यावेळी सुद्धा घामाच्या धारा सोसाव्या लागत आहेत. ही स्थिती आणखी दोन ते तीन दिवस अशी राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)