उईगर मुस्लिमांबाबत मुस्लिम राष्ट्‍रांचे मौन चिंताजनक – अमेरिका 

वॉशिंग़्टन (अमेरिका): चीनमधील उईगर मुस्लिमांच्या परिस्थितीबाबत मुस्लिम राष्ट्रांचे मौन चिंताजनक असल्याचे मत अमेरिकेचे सांसद ब्रॅड शरमन यांनी व्यक्त केले आहे. रोहिंग्या निर्वासितांना समर्थन देण्यासाठी जोरदार प्रयत्न करणारे पाकिस्तानसह, तुर्की, आखाती देश उईगर मुस्लिबाबत मात्र चकारशब्द काढत नाहीत ही गोष्ट धक्कादायक आहे, असे ब्रॅड शरमन यांनी म्हटले आहे. , हे सर्व देश रोहिंग्यांच्या मदतीबाबत थोडा आवाज उठवतात, पण उईगरांबाबात अगदी मौन धारण करतात.
चीनच्या शिनजियांग प्रांतातील अल्पसंख्याक उईगार मुस्लिमांवर चिनी प्रशासन करत असलेल्या अत्याचारांची अनेक उदाहरणे जाहीर झाली आहेत. सन 2016 पासून चीनने अल्पसंख्याकांविरुद्ध मोहीम चालवलेली आहे. सध्या सुमारे 10 लाख उईगर मुस्लिम निर्वासित शिबिरांत राहत आहेत. चीन मुस्लिम लोकसंख्येचे दमन करत असल्याचे मानवाधिकार संस्थेने म्हटले आहे.
चीनचा साथ देण्याची पाकिस्तानचा एक भयानक इतिहास आहे, असे बोर्ड ऑफ उईगर ह्यूमन राईट्‌स प्रोजेक्‍टचे अध्यक्ष नूरी टर्केल यांनी म्हटले आहे. उईगर मुस्लिमांवर होणाऱ्या जुलुमांविरुद्ध केवळ मलेशियाचे नेते अन्वर इब्राहिम यांनीच आवाज उठवल्याचे नूरी टर्केल यांनी म्हटके आहे.
अत्यंत क्रूर पद्धतीने शिनजियांग प्रांताची ओळख नष्ट करण्याचे काम चीनचा कम्युनिस्ट पक्ष करत असल्याचा आरोप कॉंग्रेस सदस्य टेड योहो यांनी केला आहे. शिनजियांग प्रांतावर तंत्रज्ञानाने सुसज्ज लष्कराची सतत पाळत असल्याचे कॉंग्रेस सदस्य डाना रोहराबेशर यांनी म्हटले आहे.
What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)