उंब्रज येथील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम; पालकांचा प्रतिसाद

बालबाजाराला प्राप्त झाले आठवडी बाजाराचे स्वरूप

उंब्रज – भाजी घ्या भाजी, ताजी-ताजी भाजी सुमधुर कोवळ्या आवाजातील या आरोळींनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा आवार गजबजला होता. मुलांच्या आरोळींना प्रतिसाद देत परिसरातील नागरिक व पालकांनीही बालचिमुंकडून भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. मुलांना व्यवहाराचे ज्ञान देण्याच्या उद्देशाने शाळा स्तरांवर सध्या बालबाजारांचे आयोजन करण्यात येत असून हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे मत व्यक्‍त होत आहे. दरम्यान या बालबाजारात पहिलीपासूनच्या सर्वच मुलांनी सहभाग घेतल्याने बालबाजाराला आठवडी बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उंब्रज ता. कराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच मुलांचा बालबाजार भरविण्यात आला होता. या उपक्रमाचे उद्‌घाटन उपसरपंच अजित जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. लहान वयापासून मुलांना छोट्या-मोठ्या व्यवसायाची गोडी निर्माण व्हावी याच बरोबर गणित विषयाचे प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान मिळावे तसेच भविष्यात कोणत्याही लहान-मोठ्या व्यवसायाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या हेतूने हा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बाल बाजारात पावट्याच्या शेंगा, हरभरा भाजी, वांगी, दोडकी, कारली, मेथी इत्यादी भाजिपाल्यासह कडधान्ये, ज्वेलरीचे साहित्य कापडी पिशव्या, रुमाल, ब्लाऊज पीस, पुस्तके वह्यासह अनेक वस्तूंची दुकाने विद्यार्थ्यांनी मांडली होती. वेगवेगळ्या प्रकारचे खवैय्याचे स्टॉलदेखील लावले होते. यात कुणी वडा पाव, भेळ, मिसळ, पाणीपुरी, इडली-सांबर, पोहे अशा प्रकारच्या खाण्याच्या वस्तूदेखील विक्रीसाठी आणल्या होत्या. त्याला पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
यावेळी विजयराव जाधव, जयवंत जाधव, संग्रामसिंह पलंगे, केंद्रप्रमुख शिंदे, मुख्याध्यापक पाटील, सुविधा जाधव, दिगंबर भिसे, राजीव रावळ, विकास होळकर, विजय घाडगे, महेश काशिद, कमलाकर पाटील उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)