उंब्रज : विजेच्या दाबामुळे जळालेली इलेक्ट्रीक उपकरणे.

150 विद्युत उपकरणांचे जळून नुकसान

उंब्रज, दि. 14 (प्रतिनिधी) – येथील वॉर्ड क्र. 6 मध्ये अचानकपणे वाढलेल्या विजेच्या प्रवाहामुळे सुमारे 100 ते 150 घरातील यांत्रिक उपकरणांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी घडली.
उंब्रज, ता. कराड येथील वॉर्ड क्र. 6 मध्ये असणार्‍या मुस्लिम गल्ली, काशीद गल्ली येथील सुमारे 100 ते 150 घरातील यांत्रिक उपकरणे विजेच्या उच्च दाबाने जळाली. यात सुमारे 5 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये असणार्‍या रुक्मिणीताई कन्या विद्यालयातील प्रिंटर तसेच कॉम्प्युटर अशी महागडी उपकरणे जळाली आहेत. आज अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिक संतापले आहेत. हा प्रकार घडल्यानंतर विज कंपनीचे अधिकार्‍यांनी पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)