उंब्रजला जानेवारीत त्रिवेणी साहित्य संमेलन

उंब्रज – उंब्रज, ता. कराड येथे भरवण्यात येत असलेले राज्यस्तरीय त्रिवेणी साहित्य संमेलन जानेवारी 2019 मध्ये होणार असून त्या अनुषंगाने संमेलन समितीची पहिलीच बैठक गुरुवारी पार पडली.
गतवर्षी प्रमाणे याही वर्षी ग्रंथदिंडी व त्यानंतर दोन दिवसाचे साहित्य संमेलन असे एकूण तीन दिवसाचे संमेलन भरविण्याचा निर्णय सर्वानुमते बैठकीत घेण्यात आला.

उंब्रज, ता. कराड येथे होत असलेल्या राज्यस्तरीय त्रिवेणी साहित्य संमेलनाचे हे तिसरे वर्ष असून गतवर्षी संमेलनाला जेष्ठ साहित्यिक, थोर विचारवंत व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळला. याही वर्षी जानेवारी महिन्यात तीन दिवसाचे त्रिवेणी साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या संमेलनामुळे उंब्रजकरांच्या विचारांच्या वैभवात भर पडत असून युवा पिढीला चांगली दिशा व मार्गदर्शन मिळत आहे. यावेळी साहित्य संमेलनाचे संयोजक समितीचे सदस्य उपस्थित होते.

पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी व लोककलांना प्रोत्साहन देण्याच्या कार्यक्रमांवर भर देण्यात येणार आहे. यासह पुढील दोन दिवस संमेलन घेण्यात येणार असून यामध्ये विविध विषयांवर परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण, कला क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना तसेच विद्यार्थी, नागरिक, ग्रामस्थ या सर्वांसाठी हे साहित्य संमेलन एक पर्वणीच ठरणार आहे.

सदर नियोजन बैठकीस निमंत्रक प्रा. मच्छिंद्र सकटे, माजी संमेलन अध्यक्ष सुरेशराव साळुंखे, द. श्री. जाधव, जयंत जाधव, सुधाकर जाधव, जयवंत जाधव, आनंदराव पाटील, सत्वशिल पाटील, सरपंच लता कांबळे, उपसरपंच पै. अजित जाधव, ग्रामपंचाय सदस्य विजयराव जाधव, श्रीमती मंगल पवार, सुर्यकांत पवार, अधिकराव जाधव, कवी राजेंद्र जाधव, उत्तम कांबळे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)