उंब्रजमध्ये घरफोडीत सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

सोन्या-चांदीच्या दागिऱ्यांसह रोकड नेली

ओतूर -जुन्नर तालुक्‍यातील उंब्रज नं. 2मध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीच्या दागिव्यांसह तीन लाख एकोण तीस हजार रुपयांची घरफोडीच्या घटनेने उंब्रज आणि परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

चोरीबाबत अधिक माहिती देताना ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आर. बी. पवार म्हणाले की, उंब्रज नं. 2 मध्ये राहणारे पोपट वामन चौधरी (वय 48) यांच्या घरात बुधवारी (दि. 16) रात्री साडेअकरा ते गुरुवारी पहाटे पाचच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचे आतील कडी कोयंडा उचकटून तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील बेडरुममधील लोखंडी कपाटात ठेवलेले पाच तोळे सोन्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळे सोन्याची नथ, अर्धा तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, अडीच तोळ्याची कर्णफुले व वेल असे तीन जोड, एक तोळा पिळ्याची अंगठी, दीड तोळ्याची चैन, दोनशे ग्रॅम चांदीचे लहान मुलांचे दागिने व 25 हजार रुपयांची रोख रक्कम असे मिळून चौधरी यांची तीन लाख एकोणतीस हजार रुपयांची चोरी अज्ञात चोरट्यांनी करून पोबारा केला. चोरीबाबत पोपट चौधरी यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सूरज बनसोडे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)