उंब्रजचे ग्लोबल प्रदर्शन महाराष्ट्रभर नावारुपास येईल

महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

उंब्रज – भविष्यात उंब्रजचे ग्लोबलचे हे प्रदर्शन महाराष्ट्रभर नावारुपास येईल, यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य व मदत आपण करणार आहे. ग्लोबल नॉंलेज एक्‍स्पोच्या पुढील वर्षीच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच येतील, त्यांना आणण्याचा शब्द मी देत असल्याचे ग्वाही राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उंब्रज, ता. कराड येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांचे विद्यमाने आयोजित ग्लोबल नॉलेज एक्‍स्पोचे उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगांवकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जि. प. व नियोजन समितीचे सदस्य मनोजदादा घोरपडे, महेशकुमार जाधव, समृद्धी जाधव, रामकृष्ण वेताळ, विशाल शेजवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ना. पाटील म्हणाले, महेशकुमार जाधव यांच्या संकल्पनेतून एक चांगला उपक्रम या नॉलेज एक्‍सपोच्या माध्यमातून सुरु करण्यात आला आहे. यामधून सर्वसामान्यांना एकाच छत्राखाली नानाविविध विषयांचे ज्ञान मिळवून भविष्यात त्याचा उपयोग होईल. अशा प्रदर्शनामुळे मुलांच्याही बौद्धिक क्षमतेला चालना मिळणार असून त्यांनी निर्माण केलेली उपकरणे ही समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम करतील.

शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून कौशल विकास कसा राबवता येईल, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत असून जास्तीत-जास्त लोकांना काम व चांगले पैसे मिळावे. यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ग्लोबलने सुरु केलेल्या उपक्रमाला सध्या प्रतिसाद कमी असला तरी पुढील वर्षी हे प्रदर्शन दहापट मोठे असेल. कारण माझ्याकडील तीन खात्यांची संबंधित स्टॉल्स या ठिकाणी असतील. माझ्याकडून लागणारी सर्वतोपरी मदत मी या प्रदर्शनासाठी करणार असून हे प्रदर्शन महाराष्ट्रात नावारुपास येईल. याच्या उद्‌घाटनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येतील व ते भाजपचे देवेंद्र फडणवीस असतील. कोणी काही म्हणो सत्ता भाजपचीच असणार आहे, असेही ना. पाटील यांनी यावेळी सांगीतले.

प्रारंभी ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन महेशकुमार जाधव यांनी प्रास्ताविकात अत्यंत खडतर परिस्थितीत संस्था इथपर्यंत कशी आली व शाळेची आजपर्यंतची गौरवशाली परंपरा सांगितली. यावेळी समृध्दी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. विशाल शेजवळ यांनी आभार मानले. कार्यक्रमास उंब्रज परिसरातील अनेक मान्यवर, पालक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)