उंबरी -बाळापूर येथील तरुणावर बिबट्याचा हल्ला

संगमनेर  – उंबरी-बाळापूर (ता. संगमनेर) येथील रहिवासी सुनिल गाडेकर व भाऊराव क्षिरसागर या दोन तरुणानवर बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत सुनिल गाडेकर या तरुणाला जखमी केले आहे.
सुनिल गाडेकर व भाऊराव क्षिरसागर हे दोघे बुधवारी रात्री दुचाकी गाडीने घराकडे येत होते. यावेळी आश्वी-उंबरी रस्त्यावरील स्वामी समर्थ केंद्रालगत भक्षाच्या शोधात दबा धरुण बसलेल्या बिबट्याने सुनिल गाडेकर या तरुणावर झडप घातली. त्यामुळे सुनिल गाडेकर व भाऊराव क्षिरसागर हे दोघेही खाली कोसळले. दोघानीही प्रसंगसावधान दाखवत मोठ्याने आरडा-ओरड करण्यास सुरवात केली. त्यामुळे घाबरलेल्या बिबट्याने तेथुन धूम ठोकली. बिबट्याच्या हल्यामुळे सुनिल गाडेकर या तरुणाच्या पायाला गंभीर जखम झाली असून त्याच्या दुचाकीच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. तर भाऊराव क्षिरसागर यांना मुकामार लागला आहे. या दोघांनाही नागरीकानी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परिसरात बिबट्याच्या हल्याची ही तिसरी घटना असल्याने पिजंरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)