उंबरीत रानगव्यांकडून शेतीचे नुकसान

स्ट्रॉबेरी उत्पादकांसह इतरही शेतकरी अडचणीत

पाचगणी – भिलारपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उंबरी गावात रानगव्यांनी अक्षरश: धुडगूस घालून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. लाखो रुपये खर्चून स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणारा शेतकरी या गव्यांमुळे आर्थिक संकटात सापडला असून वनविभागाने या रानगव्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
उंबरी हे गाव भिलारपासून 3 किलोमीटर अंतरावर असून डोंगरमाथ्यावर वसले आहे.

अवेळी हवामान, आर्थिक चिंता, वाढता खर्च व कमी उत्पन्न आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आधीच पुरता हतबल झाला आहे. त्यातच आता रानटी प्राण्यांनी पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. अगदी दिवसाढवळ्या गव्यांचे कळप शेतात धुडगुस घालून पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकरी या रानटी प्राण्यांच्या भीतीच्या छायेत आहेत. सध्या पिकाच्या नुकसाणीने आर्थिक गर्तेत सापडले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उंबरी येथील नामदेव शंकर पार्टे, राजाराम हरीबा उंबरकर, संदीप किसंन उंबरकर, संपत आबाजी उंबरकर, सावळा हरीबा उंबरकर, महेश आनंदा उंबरकर यांच्या हातातोंडाशी आलेल्या स्ट्रॉबेरीचे आणि गव्हाचे पिकांचे गव्यांच्या कळपाने अतोनात नुकसान केले आहे. तर इतर साहित्याचेही मोडतोड केली आहे. याबाबत वनविभागाकडे तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी मूग गिळून गप्प राहत नुकसान सोसत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)