उंदीर निर्मूलनाचे काम करणारी संस्था वैध – चंद्रकांत पाटील

File Photo

मुंबई – मंत्रालयातील उंदीर निर्मूलनासाठी नेमलेली विनायक मजूर सहकारी संस्था ही वैध असून संस्थेचे कामकाज नियमित होत असल्याचे संस्थेने सादर केलेल्या लेखापरिक्षण अहवालातून सहायक निबंधक,सहकारी संस्था, मुंबई शहर यांना आढळून आले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.पाटील यांनी सांगितले की, मंत्रालयातील उंदीरांच्या निर्मूलनासाठी विनायक मजूर सहकारी संस्थेला जिल्हा उपनिबंधकामार्फत काम देण्यात आले होते. या संस्थेच्या वैधतेसंदर्भात सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

यासंबंधी सहायक निबंधकांनी चौकशी केली असता संस्थेचे संस्थापक अमोल शेडगे यांच्या मृत्यूनंतर संस्थेच्या अध्यक्षपदी गणेश भिकू सुतार व सचिव पदी जयेश नरेंद्र पवार यांची निवड संस्थेच्या सभासदानी केली असल्याचे संस्थेने सादर केलेल्या कागदपत्रावरून आढळून येते. तसेच संस्थेचे नियमित बँक खाते सुरू असून त्यांचे नियमित लेखापरिक्षण होत असल्याचे कागदपत्रावरून आढळून आले आहे. संस्थेच्या दफ्तराची चौकशी सहायक निबंधकामार्फत सुरू करण्यात आली आहे.

तसेच ही संस्था मुंबई शहर मजूर सहकारी संस्थांचा संघाचे सभासद आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई शहर यांच्या नियंत्रणाखाली संस्थेचे कामकाज सुरू असून संस्था दरवर्षी लेख्यांचे परिक्षण अहवाल निबंधक कार्यालयाकडे पाठवित आहे. यावरून ही संस्था वैध असून त्यांचे कामकाज नियमितपणे सुरु असल्याचे बँकेच्या कागदपत्रावरून दिसून येते. संस्थेचे कामकाज नियमित सुरू असल्याचे पत्रही संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांनी दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)