उंदीर, घुशी आणि खेकड्यांच्या बिळांमुळेच कालवा फुटला!

पाटबंधारे विभाग ठाम : विधानसभेत लेखी उत्तर

पुणे – “उंदीर, घुशी आणि खेकड्यांच्या बिळांमुळेच कालव्याचा भराव खचून तो फुटला,’ असे लेखी उत्तर जलसंपदा विभागाने आमदारांनी विचारलेल्या लेखी प्रश्‍नावर दिले आहे. त्यामुळे कालवा कसा फुटला, यावर गदारोळ होऊनही जलसंपदा विभाग अजूनही उंदीर, घुशीं, खेकड्यांमुळेच तो फुटला यावर ठाम आहे.

मुठा उजवा कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेबाबत आमदार माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लेखी प्रश्‍न विचारला होता. त्यामध्ये कालवा बाधितांशी संबंधित तसेच कालवा दुरुस्ती आणि अन्य विषयांबाबत प्रश्‍न विचारले होते. त्याला उत्तर देताना “कालवा कशामुळे फुटला’ याचे लेखी उत्तरही जलसंपदा विभागाने दिले आहे.

खडकवासला प्रकल्पाच्या नवीन मुठा उजवा कालव्याच्या एकूण 202 कि. मी. लांबी पैकी 30 किमी कालवा पुणे शहराच्या मध्यभागातून आणि दाट लोकवस्तीतून जातो. 26 सप्टेबर रोजी कालवा विसर्ग 1,277 क्‍युसेक होता. 27 सप्टेंबरला सकाळी 11 ते 11.15 च्या दरम्यान कालव्याच काही भाग फुटला. कालव्याच्या तळातून म्हणजे भरावाच्या खालून फाउंडेशनला पाईपिंग झाल्यामुळे म्हणजेच बिळे पडल्यामुळे या ठिकाणचा भराव खचून हा कालवा फुटल्याचे उत्तरात म्हटले आहे.

याशिवाय कालव्यातील पाणी, कालवा अतिवाहकाचे लगतच फुटल्यामुळे सगळे पाणी नाल्यातून वाहून गेले. सिंहगड रस्त्यावरील पुलाजवळ नालामोरीत कचरा अडकल्याने आणि नाल्यामधील पाणी जाण्याचा मार्ग अरुंद झाल्याने दांडेकर पुलानजीकच्या झोपडपट्टी परिसरात आणि सिंहगड रस्त्यावर पाणी वाहण्यास सुरूवात झाली. हे पाणी ज्या नाल्यातून ड्रेन होत होते, त्या नाल्या लगतच झोपडपट्टी असल्यामुळे त्यामुळे हे पाणी झोपडपट्टीत घुसल्यामुळे काही घरांचे नुकसान झाल्याचेही या उत्तरात नमूद केले आहे. दरम्यान, यातील सर्व पंचनामे झाले असून, दुर्घटनाग्रस्तांना मदत दिल्याचेही यामध्ये नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)