उंदरामुळे तीन मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळलेली

आगरा: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तो व्हिडीओ पाहून अगदी सगळेच आश्चर्यचकित होतील. आगऱ्यामध्ये एक तीन मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळलेली या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते आहे. अगदी काही सेकंदात ही इमारत जमीनदोस्त झाल्याचे  व्हिडीओत पाहायला मिळत आहे. आगऱ्यातील टीलेवाली गल्लीतील ही घटना आहे. उंदरांनी इमारतीचा पाया पोखरल्याने तीन मजली इमारत कोसळल्याचे बोलले जात आहे.

सुदैवाने इमारतीतल्या लोकांनी वेळीच इमारत खाली केल्याने जीवितहानी टळली. इमारतीची अवस्था जर्जर झाल्याने काही दिवसांपूर्वीच रहिवाशांनी ही इमारत सोडली होती. तीन मजली इमारत काही सेकंदात कोसळण्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 8 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून इमारत पडल्यावर सगळीकडे मोठ्या प्रमाणात धूळ दिसते आहे. एका वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, असाच एक प्रकार आंध्र प्रदेशातील गंटुरमध्ये घडला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तिथे अशा प्रकारे इमारत पडली. त्या घटनेतही जिवीतहानी झाली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)