उंडवडीच्या सरपंचपदी वैशाली गुंड

यवत- उंडवडी (ता.दौंड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार राहुल कुल गटाच्या वैशाली सचिन गुंड यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वीच्या सरपंच रोहिणी पांढरे यांच्यावर इतर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. तो ठराव 1 विरुद्ध 8 मतांनी मंजूर झाला होता; परंतु पांढरे यांनी या ठरावाला जिल्हा अधिकारी यांच्याकडे आव्हान दिले होते. जिल्हा अधिकारी यांनी रोहिणी पांढरे यांचा अर्ज फेटाळल्याने सरपंचपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार ही निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेत सरपंच पदासाठी कुल गटाच्या वैशाली गुंड यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी विजय खारतोडे यांनी सरपंच म्हणून वैशाली गुंड यांना घोषित केले. या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी यांना ग्रामसेवक उबाळे आणि गावकामगार तलाठी मेचकर यांनी सहकार्य केले. गट-तट न पहाता सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावच्या विकासासाठी काम करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच वैशाली गुंड यांनी बोलताना सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)