बेल्हे- उंचखडक येथे बिबट्याचा गायीवर हल्ला

बेल्हे- दबा धरलेल्या बिबट्याने शेतकऱ्याच्या घरालगत असलेल्या गोठ्यात प्रवेश करून एका गायीवर हल्ला करून ठार केल्याची घटना उंचखडक येथे पहाटे घडली. याबाबत सविस्तर माहीती अशी उंचखडक (ता. जुन्नर) येथील कमल सुरेश कणसे यांचा आपल्या घरासमोर गायींचा गोठा आहे. पहाटे चारच्या सुमारास गायींचा हंबरण्याचा आवाज आला असता ते घराबाहेर आले, तेहा बिबट्या एका गायीवर हल्ला करून जवळच असलेल्या ओढ्याकडे फरफटत घेऊन जाताना दिसला. ते आरडाओरडा करत धावत गेले, तोपर्यंत बिबट्याने त्या गायीला जागीच ठार केले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनरक्षक जे. बी. सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. परिसरात बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)