ई वे बिलाची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांची संख्या वाढणार 

नवी दिल्ली – इंट्रा स्टेट ई-वे बिल लागू करणाऱ्या राज्याच्या संख्येत वाढ होणार आहे. शासनाकडून सादर करण्यात आलेल्या यादीत दोन राज्याची भर पडणार आहे. आसामला 16 मे रोजी व राज्यस्थानात 20 मे पासून दोन राज्यात ई-वे बिल लागू केल्यावर एकूण राज्याची संख्या 20 वर पोहोचणार आहे. आतापर्यत 18 राज्ये व केंद्रशासित प्रदेशामध्ये इंट्रा स्टेट ई-वे बिल लागू करण्यात आले आहे. 18 राज्यांच्या अंतर्गत 50 हजार रुपयापेक्षा जादा माल ट्रान्सपोर्ट करण्यात आल्यास त्यावरही ई- वे बिल बनवणे बंधनकारक राहणार आहे. सरकारकडून बिल कर जमा करण्यासाठी सोपे जावे यासाठी इंटर स्टेट आणि इंट्रा स्टेट अशी दोन बिल यात कोणताही बदल शासनाकडून करण्यात आला नाही.

कामकाजाच्या वेळी फक्त इंटर स्टेट बिल बनवताना काही गोष्टीचे साम्य ठेवून त्याचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ई-वे बिल लागू करण्यात आल्यामुळे देशभरामध्ये व्यापार व ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मार्ग सोपा झाला आहे. 13 मे पर्यत देशभरामधून 4.15 कोटी रुपयापेक्षा जादा कर गोळा झाला आहे. त्यामुळे ई-वे बिल लागू करण्यात आल्याचा फायदा झाल्याचे वरील आकडेवारीतून स्पष्ट करण्यात आले. याच्यात एकूण 1 कोटी ई-वे बिलाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)