ई-वाहनांमध्ये लवकरच ‘सुपर कॅपेसिटर बॅटरी’

इस्त्रो, एआरएआयचा संयुक्त उपक्रम : काम अंतिम टप्प्यात

पुणे – प्रदूषणाची वाढती पातळी लक्षात घेता सरकारकडून ई-वाहनांवर भर देण्यात येत आहे. मात्र, सद्यस्थितीत ई-वाहनांमधील बॅटरीची क्षमता कमी असल्याने नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद कमी आहे. या पार्श्‍वभूमीवर अवकाशयानांमध्ये वापरली जाणारी सुपर कॅपेसिटर यंत्रणा असणारी बॅटरी येत्या काळात ई-वाहनांमध्ये बसविली जाणार आहे. यासाठी इस्त्रो (भारतीय अवकाश संशोधन संस्था) आणि एआरएआय (ऑटोमेटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया) या दोन संस्था संयुक्तपणे काम करत असून हे काम अंतिम टप्प्यात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंधनावरील वाहनांमुळे प्रदूषणाच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेता सरकारकडून ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी ई-वाहनांचा वापर करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. याला नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ई-वाहनांच्या निर्मितीमध्ये अजून संशोधन होणे गरजेचे आहे. ई-वाहनांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या बॅटरीची क्षमता कमी पडते. यामुळे जास्त क्षमतेच्या बॅटरीची निर्मिती गरजेची आहे. परिणामी वाहनांचा वापर वाढेल. या पार्श्‍वभूमीवर वाहन उद्योगातील संशोधन संस्था “एआरएआय’ने इस्त्रोबरोबर बॅटरीवर संसोधन करण्याचे काम सुरू केले आहे. इस्त्रोने अवकाशयानांसाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटरीचे मॉडेल स्वतः तयार केले आहे. त्याच धर्तीवर वाहनांसाठी “सुपर कॅपेसिटर’ असणारी बॅटरीची निर्मिती करता येईल का? यावर दोन्ही संस्था काम करत आहेत. अवकाश यानामधील बॅटरीला वापरण्यात येणारा “सुपर कॅपेसिटर’ वाहनांच्या बॅटरीला जोडून त्यांची क्षमता वाढविली जाणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असे “एआरएआय’चे वरिष्ठ उपसंचालक एम. आर. सराफ यांनी सांगितले.

सध्याच्या वाहनांवर होणार अभ्यास
सध्या बॅटरीवर चालणारे वाहन एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर किती अंतर धावते, बॅटरीचे आयुर्मान किती, ही बॅटरी किती प्रमाणात सुरक्षीत आहे, याचा अभ्यास करून “सुपर कॅपेसिटर’ असणाऱ्या बॅटरीची निर्मिती सुरू आहे. हे संशोधन पूर्ण होऊन बॅटरी तयार झाल्यास त्याचा ई-वाहनांना मोठा फायदा होणार आहे, असे सराफ यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)