‘ई-बस’ चाचणीकडे वरिष्ठांची पाठ

पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी “स्मार्ट सिटी’ अंतर्गत 25 “ई-बस’ दाखल झाल्या आहे. निगडी येथील पीएमपीच्या आगारात एका बसची सोमवारी (दि. 28) चाचणी घेण्यात आली आहे. मात्र, पुणे परिवहन महामंडळाचा (पीएमपीएमएल) एकही वरिष्ठ अधिकारी तेथे हजर नव्हता.

पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल झालेल्या ई-बससाठी सुरुवातीला पुण्यातील भेकराईनगर तर, पिंपरी-चिंचवड येथील निगडीच्या पीएमपी आगारात तात्पुरत्या स्वरुपात “चार्जिंग स्टेशन’ उभारण्यात आले आहे. आणखी काही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी हलचाली सुरू आहेत. सोमवारी झालेल्या “चार्जिंग स्टेशन’च्या चाचणीच्या वेळी मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. “ई-बस’ची ही महत्त्वाची चाचणी असतानाही याकडे कोणीच फिरकलेच नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसरीकडे बस पाहण्यासाठी पीएमपी कर्मचारी आणि प्रवासीही तेथे जमले होते. ई-बसच्या निगडी आगारात घेण्यात आलेल्या चाचणीच्या वेळी उपस्थित असलेल्या एका स्थानिक अधिकाऱ्याने बसमध्ये बसलेल्या काही प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. आपल्या निवडक सहकाऱ्यांना सोबत घेत स्वतः ऐटीत बसून चाचणीसाठी निघून गेला. अधिकाऱ्याचा तोरा बघून पीएमपीचे कर्मचारी देखील आवाक्‌ झाले. संबंधित अधिकारी बस समवेत फोटो काढून ते सोशल मीडियावर “व्हायरल’ करण्यात मग्न होते.

अशी आहे “ई-बस’
निगडीत चाचणीसाठी दाखल झालेल्या “ई-बस’मध्ये डस्ट बीन, आरामदायी आसने, एसी, आसनाशेजारी मोबाईल चार्जिंग पॉईंट, दोन्ही बाजुला सीसीटीव्ही कॅमेरा आणि डिजीटल फलक आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेल्या या बसचे तिकीट किती याबाबत सामान्य प्रवाशांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून त्याबाबत पीएमपी अधिकाऱ्यांना काही प्रवाशांनी विचारले असता त्यांची उत्तर देताना भंबेरी उडाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)