ई-बससाठी दोन कंपन्यांच्या निविदा

तीन वेळा मुदतवाढ देऊनही अल्प प्रतिसाद

पुणे – पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या वातानुकूलित इलेक्‍ट्रिक बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे तब्बल तीन वेळा मुदतवाढ देऊनही 9 मीटर लांबीच्या बससाठी एक आणि 12 मीटर लांबीच्या बससाठी दोन कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. याबाबत तांत्रिक तपासणी करण्याचे काम सुरू असून यानंतर अंतिम निर्णय होणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाचशे वातानुकूलित ई-बस भाडेकराराने घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. त्यानूसार साधारणतः दोन महिन्यांपुर्वी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. वातानुकूलित ई-बसमध्ये पहिल्या टप्प्यात 150 आणि दुसऱ्या टप्प्यात 350 बसेस घेण्याचे नियोजन आहे. या बस ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्‍ट बेसिस (जीसीसी) या तत्त्वावर घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात घ्यावयाच्या 150 वातानुकूलित ई-बससाठीच्या निविदा 18 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. सुरवातीला निविदा स्वीकारण्याची मुदत 9 ऑक्‍टोबरपर्यंत होती. मात्र, ती 17 ऑक्‍टोबरपर्यंत वाढवण्यात आली. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने त्यात पुन्हा एकदा वाढ करुन 27 ऑक्‍टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. 9 मीटर लांबीच्या बससाठी चीनच्या बीवायडी कंपनीची निविदा प्राप्त झाली आहे. 12 मीटर लांबीच्या बससाठी टाटा कंपनीसह बीवायडी कंपनीची निविदा प्राप्त झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
2 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)