ई-फार्मसीविरोधात आज औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद

मुंबई – औषधांच्या होणा-या ऑनलाईन विक्री आणि ई-फार्मसीविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट’ (एआयओसीडी) या देशभरातील केमिस्ट्‌स आणि वितरकांच्या सर्वात मोठ्या कंपनीने बंदची हाक दिली आहे.

ई-फार्मसीच्या निषेधार्थ गुरुवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सर्व औषधांची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या संपात मुंबईतील साडेसहा हजार औषध विक्रेते सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील 60 हजार, तर देशातील साडेआठ लाख औषध विक्रेत्यांनी बंदला पाठिंबा दर्शविला आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, द रिटेल अँड डिस्पेन्सिंग केमिस्ट असोसिएशनचा यात सहभाग आहे.

केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री करण्याचा दिलेला कोणताही आदेश किंवा ई-फार्मसीजना भारतात कोणत्याही स्वरुपात कार्य करण्याची दिलेली मुभा यांचा निषेध करण्यासाठी भारतातील सर्व केमिस्ट्‌सनी एक दिवसाचा बंद पुकारला आहे.

औषधांची ऑनलाइन विक्री केल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम होऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशाच्या तंत्रज्ञानप्रेमी तरुण पिढीचे कधीच भरुन न येणारे नुकसान होऊ शकते, असे एआयओसीडीने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)