ई-कॉमर्स कंपन्यांबाबतचे निकष अधिक कडक

एक्‍सक्‍लुजिव्ह विक्रीवर निर्बंध

नवी दिल्ली – विदेशी गुंतवणूक असलेल्या ई-कॉमर्स कंपन्यांसाठीचे निकष सरकारने आज अधिक कडक केले. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या कंपन्यांना “एक्‍सक्‍लुजिव्ह’ विक्री करण्यास मज्जाव केला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या ऑनलाईन किरकोळ विक्री करण्याबाबतचे थेट विदेशी गुंतवणूकीचे सुधारित धोरणानुसार या कंपन्यंना अन्य कंपन्यांबरोबर कोणताही भेदभाव न करता समान सेवा किंवा सुविधा द्याव्या लागतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विदेशी गुंतवणूक असलेल्या ई-कॉमर्स कंपन्यांची मोठी स्पर्धा देशांतर्गत कंपन्यांसमोर आहे. या देशांतर्गत कंपन्यांचे हित जपण्याच्याद्‌ष्टीने हे सुधारित निकष लागू करण्यात आले आहे. हे सुधारित धोरण पुढील वर्षी फेब्रुवारीपासून अंमलात येणार आहे. या सुधारित धोरणानुसार ई-कॉमर्स कंपन्यांकडून किंमती प्रभावित केल्या जाऊ शकणार नाहीत. तसेच “एफडीआय’च्या मार्गदर्शक तत्वांची ई-कॉमर्स कंपन्यांकडून अधिक चांगली अंमलबजणी केली जाऊ शकेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या धोरणानुसार किरकोळ विक्रेत्यांना एकाच ई बाजारपेठत 25 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वस्तूंची विक्री करण्याची परवानगी असणार नाही. ई-कॉमर्स बाजारपेठ कोणत्याही विक्रेत्यास “एक्‍सक्‍लुजिव्ह’ विक्री करण्याचे आदेश देऊ शकणार नाहीत, असेही या धोरणात म्हटले आहे. ई-कॉमर्स कंपनीकडून विक्रेत्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गोदाम, जाहिराती, मार्केटिंग, पेमेंटसारख्या सेवांसाठी कोणताही कोणताही भेदभाव केला जाऊ शकणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)