ई-कॉमर्समधून बचतगट चळवळीला मोठी चालना मिळेल – राज्यपाल

महालक्ष्मी ई-सरस’ चा प्रारंभपहिल्या टप्प्यात बचतगटांची ५० उत्पादने ॲपवर उपलब्ध

मुंबई: ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या धर्तीवर बचतगटांची उत्पादने आता‘महालक्ष्मी ई-सरस’ या मोबाईल ॲप तसेच वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत. बचतगटांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणाऱ्या या ई – कॉमर्स व्यासपीठाचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अनावरण करण्यात आले. प्राथमिक टप्प्यात या ॲपवर बचतगटांची ५० उत्पादने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या माध्यमातून राज्यातील महिला बचतगट चळवळीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर आज बचतगट आणि ग्रामीण कारागिरांच्या उत्पादनांच्या ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे राज्यपाल राव यांच्या हस्ते आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. आजपासून ४ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन आणि विक्री सुरु राहणार आहे. प्रदर्शनात देशभरातील बचतगट सहभागी झाले असून ५११ स्टॉलच्या माध्यमातून ते उत्पादनांची विक्री करणार आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांचे ७० स्टॉल असून त्यातून मुंबईकरांना वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घेता येणार आहे.

बचतगटांनी इन्शुरन्स, बँकिंग, सेवा क्षेत्रातही यावे – राज्यपाल

सी. विद्यासागर यावेळी म्हणाले, गेल्या पाच वर्षांमध्ये ‘महालक्ष्मी सरस’ अंतर्गत महिला बचतगटांनी लक्षणीय प्रगती केली आहे. महिला बचतगटांची उत्पादने आता वर्षभर मिळू लागली आहेत. आज ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारखे रिटेलर्स तसेच डिपार्टमेंटल स्टोअर्सदेखील बचतगटांची उत्पादने ठेवू लागली आहेत. हा बचतगट चळवळीचा मोठा विजय आहे. महिला बचतगटांमुळे राज्यातील महिलांची मोठी सामाजिक आणि आर्थिक प्रगती झाली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

राज्यपाल म्हणाले, देशाच्या आर्थिक विकासात सेवा क्षेत्र, उत्पादन क्षेत्र आणि कृषी क्षेत्र या तीन प्रमुख क्षेत्रांचे मोठे योगदान आहे. महिला बचतगटांनी आता कृषी व ग्रामीण उत्पादनांसोबत इन्शुरन्स, बँकिंग, तसेच इतर सेवा क्षेत्रातदेखील यावे. आज सेवा क्षेत्र वेगाने वाढत आहे. त्यामुळे महिलांची आर्थिक प्रगती झपाट्याने होईल, असे ते म्हणाले. शासनाने याच ठिकाणी प्रदर्शनाला जोडून ‘ज्ञान कौशल्य केंद्र’ (Knowledge  & Skills Centre) सुरु करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)