ईशान खट्टरच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’चा ट्रेलर रिलीज

दिग्दर्शक माजिद मजिदी यांच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटाचा नवीन ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटातून अभिनेता  शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ईशान रंगभूमी कलाकार मालविका मोहनन हिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मालविका ही सिनेमेटोग्राफर के. यू. मोहनन यांची मुलगी आहे. ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ हा मालविकाचाही पहिला बॉलिवूड सिनेमा आहे.

या चित्रपटात ईशानने धोबी घाटमध्ये राहणाऱ्या एका मुलाची (आमिर) व्यक्तिरेखा साकारली आहे. ईशानच्या मोठ्या बहिणीची (तारा) भूमिका मालविका मोहननने साकारली आहे. पैसा कमावण्यासाठी ईशान कशाप्रकारे अमली पदार्थांची तस्करी करू लागतो, बहिण ताराला तुरुंगवासात का जावं लागतं आणि तिला बाहेर काढण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांमध्ये ईशानसमोर वेगळीच परिस्थिती निर्माण होते, या सर्व गोष्टींचं चित्रण या  ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)