ईशान्य भारतातील लोकहिताकडे लक्ष – राष्ट्रपती

नवी दिल्ली – राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सरकारचे ईशान्य भारतातील लोकांच्या हिताकडे विशेष लक्ष असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की या भागातील अदिवासींचा चरितार्थ बांबुच्या उत्पादनावर चालतो. पण बांबुची गणना वृक्ष म्हणून केली जात असल्याने बांबु कापणे आणि त्याची वाहतूक करणे हे त्यांच्यासाठी जिकीरीचे बनले होते पण सरकारने वृक्ष या वर्गवारीतून बांबुला वगळले आहे. त्यामुळे आता बांबुची झाडे कापणे आणि त्याची वाहतूक करणे त्यांच्यासाठी सोयीचे झाले असून अदिवासींना या निर्णयाचा मोठा लाभ होईल असे राष्ट्रपतींनी नमूद केले.

अदिवासींच्या वन उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमतीत मोठी वाढ करण्यात आल्याची माहितीही राष्ट्रपतींनी दिली. ईशान्य भारतातील विविध क्षेत्रातील विकास प्रकल्पांना केंद्र सरकारकडून शंभर टक्के निधी पुरवला जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. ईशान्य भारतातील वीज पुरवठ्यासाठी एनडीए सरकारने गेल्या तीन वर्षांत दहा हजार कोटी रूपयांची मदत केली असल्याचेही ते म्हणाले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)