ईशान्येकडील 25 पैकी 21 जागा जिंकण्याचे अमित शहांचे टार्गेट

गुवाहाटी – भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्यांनी पक्षापुढे ईशान्येकडील 25 पैकी 21 जागा जिंकण्याचे उद्दीष्ठ ठेवले आहे. पक्षाच्या बुथ प्रमुखांच्या येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलताना त्यांनी हे उद्दीष्ठ स्पष्ट केले. मला ईशान्येकडील 25 पैकी किमान 21 जागा हव्या आहेत असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.

ते म्हणाले की आज केवळ मिजोराम वगळता बाकीच्या सर्व राज्यांमध्ये नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सची सत्ता आहे त्यात भाजप हा प्रमुख भागीदार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या भागात आठ जागा जिंकल्या आहेत. पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी आणि या भागाचा विकास करण्यासाठी भाजपला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळायला हवा असे त्यांनी यावेळी नमूद केले. आसामातील भाजप पदाधिकाऱ्यांना सुचना करताना ते म्हणाले की येथे पक्षाचा आधार आणखी वाढवण्याची गरज असून त्यासाठी मतदार यादीच्या प्रत्येक पानासाठी एक प्रमुख बनवून येथे पक्षाचे जाळे वाढवण्याचा जबाबदारी तुम्ही पार पाडली पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)