ईव्हीएम स्ट्रॉंगरूपवर पहारा ठेवणाऱ्या कॉंग्रेस नेत्याचा गारठून मृत्यू 

जशपुरानगर (छत्तीसगड): ईव्हीएम स्ट्रॉंगरूमवर पहारा ठेवणाऱ्या कॉंग्रेस नेत्याचा गारठून मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंकज टिर्की (32) असे या कॉंग्रेस नेत्याचे नाव आहे. कुनकुरी तालुक्‍यातील क लिबा गावाचे रहिवासी असलेले पंकज टिर्की आपल्या साथीदारांसह दाडकचौरा येथील ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंगरूमवर पहारा देण्याचे काम करत होते.

छत्तीसगडमधील निवडणुका पार पडल्यानंतर एव्हीएम्समध्ये काही हेराफेरी होऊ नये, म्हणून जशनपूरनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्ते ईवीएम ठेवलेल्या स्ट्रॉंगरूम्सवर 24 तास पहारा देत आहेत. स्ट्रॉंगरूमवर पहारा देण्याच्या काळात पंकज टिर्की यांची तयेत अचानक बिघडली. त्यांना लकवा भरला. तेथील लोकांनी पंकज टिर्की यांना जिल्हा रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्‍टरांनी टिर्की यांना अंबिकापूर येथे नेण्यास सांगितले. मात्र अंबिकापूर येथे ते मरण पावले. रात्रभर जागून पहारा देताना गारठल्यामुळे त्यांना मृत्यू आला असे त्यांच्या साथीदारांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)