ईव्हीएम मशिनच्या प्रत्याक्षिकला लोकांची गर्दी

नीरा येथे महसुलाच्या वतीने व्हीव्हीपीएटीचे प्रात्यक्षिक

नीरा- ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून दिले गेलेले मत आपल्या इच्छित उमेदवारास दिले असल्याची खात्री करण्यासाठी शासनाच्या वतीने मतदान यंत्राबरोबरच आता ते पडताळण्याची व्यवस्था असलेले व्हीव्हीपीएटी मशीन यापुढील निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. महसुल विभागाच्या वतीने पुरंदर तालुक्‍यातील विविध ठिकाणी प्रात्यक्षिका मार्फत लोकांना माहिती देण्यात येत आहे. नीरा येथील प्रात्यक्षिकास दोनशे पेक्षा जास्त लोकांनी भेट देऊन माहिती घेतली.
वाल्हा मंडल अंतर्गत आज नीरा, कर्नलवाडी, गुळुंचे, पिंपरे, पिसूटी, मांडकी आदी गावात आज प्रात्यक्षिकाद्वारे लोकांना माहिती देण्यात आली. यामध्ये नीरेच्या तलाठी शीतल खराद, जेऊरच्या तलाठी नीलम भोगावडे, गुळुंचेचे तलाठी श्रीकांत अलोणी यांनी लोकांना माहिती दिली. त्यांना कोतवाल समाधान सोनावणे, नारायण भंडलकर, रवी जाधव, संदीप सोनावणे आदींनी सहकार्य केले. नीरा येथील प्रात्यक्षिकास निरेचे उपसरपंच बाळासाहेब भोसले, अनिल चव्हाण, कल्याण जेधे, विजय शिंदे, पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे, शामराव लोणकर, सागर थोपटे, फिरोज शेख आदींनी माहिती घेत प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.
यावेळी श्रीकांत अलोणी म्हणाले की, मतदान यंत्रात ज्या चिन्हां समोरील बटन आपण दाबले आहे, त्या चिन्हाची कागदी स्लीप निघणार आहे. ती मतदाराला दिली जाणार नाही. ती त्या यंत्रातच जपून ठेवली जाणार आहे. उमेदवाराला जर मतदान यंत्रातील मतदानावर शंका असेल तर या स्लीपचा वापर करून पुन्हा मोजणी केली जाईल. त्यामुळे मतदान यंत्रात काही घोळ झाला तर लगेच लक्षात येईल.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)