ईव्हीएम मशिनचे प्रतिकात्मक दहन ; जालिंदर चोभे यांचे आंदोलन

मतदानासाठी बॅलेट पेपरवर वापरण्याची मागणी

नगर: मतदान यंत्र विरोधी जनआंदोलनाचे जालिंदर चोभे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाची सांगता गुरुवारी वाडियापार्क येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर ईव्हीएम मशिनचे प्रतिकात्मक दहन करून करण्यात आले.

लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी चोभे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरू केले होते. चार दिवसीय उपोषणात त्यांनी देशात विविध भागात झालेल्या ईव्हीएम घोटाळ्याच्या जनजागृतीवर पत्रके व पुस्तकांचे नागरिकांना वाटप करून जनजागृती केली आहे. व्हीव्हीपॅट मशिनबाबत खुलासा केला आहे.

प्रत्येक उमेदवाराला मत पडताळणी, फेर मतमोजणीचा अधिकार होता. मात्र तो अधिकार निवडणूक आयोगाने काढून घेतला आहे. ईव्हीएम मशिनमध्ये दोष आढळत असून, नव्याने जोडण्यात येत असलेल्या व्हीव्हीपॅट मशिन देखील दोषमुक्त झालेल्या नाहीत. यामुळे येत्या लोकसभेची मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी त्यांनी केली होती. ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळे झाल्यास देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाही रुढ होणार आहे. निवडणुका लोकशाहीपध्दतीने पार पाडण्यासाठी या यंत्रणेत बदलाव आणण्यासाठी जनजागरण करीत असल्याचे चोभे यांनी स्पष्ट केले. अशोक वराट, महेश जपकर, संकेत जपकर उपस्थित होते.


मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशिनमुळे सोपी झाली आहे. व्हीव्हीपॅट मशिनमुळे मत नक्की कोणाला दिले आहे, याची खात्री लोकांना करून दिली जात आहे. या दोन्ही मतदान यंत्राविषयी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. मात्र मतदान यंत्र विरोधी जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना ईव्हीएम मशिनचे प्रतिकात्मक दहन केले आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. मशिनचे प्रतिकात्मक दहन केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याची कारवाई केली जाणार आहे.
अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक शाखा

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)