ईव्हीएम पूजा प्रकरणात विनाकारण गोवण्याचा प्रयत्न -अंजली देवकर

विनाकारण प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये ; माझी बदनामी करण्याचे षड्‌यंत्र थांबवा

नगर: महापालिका निवडणुकीत एका मतदान केंद्रावर झालेल्या ईव्हीएम मशीन पूजेच्या प्रकरणावरून जाणीवपूर्व लक्ष्य करण्याचे प्रकार थांबवावे. विनाकारण माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये, अशी विनंती कुस्तीपट्टू अंजली देवकर-कल्लाकट्टी यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रभाग 9 मध्ये श्रीपाद छिंदम याच्या भावाने मतदान केंद्रात येवून ईव्हीएम मशिनची पूजा करण्याचा प्रकार केला होता. मतदान यंत्राच्या खात्रीसाठी उमेदवार म्हणून मी स्वत: मतदान केंद्र प्रमुखांच्या सांगण्यावरून संबंधित केंद्रात उपस्थित होते. त्याचवेळी उमेदवार छिंदम याचा भाऊ तिथे आला व त्याने थेट मतदान यंत्राची पूजा सुरू केली. त्यावेळी केवळ योगोयोगानेच मी तिथे उपस्थित होते. माझे त्याच्याशी अथवा त्याच्या कोणत्याही समर्थकाशी संभाषण झाले नाही. त्याची पूजा चालू असताना मी केवळ काय चालले आहे हे पाहण्यासाठी क्षणभर तिथे उभी होते व त्यावेळी अभावितपणे माझे हात जोडले गेले.

वास्तविक पाहता त्या ईव्हीएमच्या पूजेचा व माझा दुरान्वयेही संबंध नाही. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल झाला आहे. परंतू या प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न सुरू केला जात आहे. मी जातपात न मानणारी एक खेळाडू आहे. माझे प्रेम, माझी जात व माझा श्‍वास हा माझा खेळ आहे. मैदान हेच माझे दैवत आहे. अंजली फौंडेशनच्या माध्यमातून मी महिलांना सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. त्यामुळे बदनामी करण्याचे षड्‌यंत्र थांबावे, अशी मागणी अंजली देवकर-वल्लाकट्टी यांनी केली आहे.

संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मिळालेला क्रिडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या पुरस्काराची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करीत आहे. सुरू असलेल्या बदनामीबद्दल अनेकांकडून पाठीशी असल्याचा धीर दिला आहे. नगरकर पाठीशी असून सुरू असलेल्या अग्निपरीक्षेतही मी नक्कीच उत्तीर्ण होईल, असा मला विश्‍वास अंजली देवकर यांनी व्यक्‍त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)