ईडीचा कारभार संजयकुमार मिश्रांकडे 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ईडी म्हणजेच सक्त वसुली विभागाच्या प्रमुखपदी संजयकुमार मिश्रा यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे हा कारभार अतिरीक्त स्वरूपात असणार आहे. मिश्रा हे 1984 च्या बॅचचे रेव्हेन्यु सर्व्हिसचे अधिकारी आहेत. ते आयकर विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या कडे हा कारभार तीन महिन्यांसाठी अतिरीक्त स्वरूपात देण्यात आला आहे. ईडीचे विद्यमान प्रमुख कर्नलसिंग हे उद्या रविवारी निवृत्त होत आहेत.

मिश्रा यांच्याकडे सध्या आयकर विभागाचे मुख्य आयुक्त म्हणून कार्यभार आहे म्हणून त्यांच्याकडेच हा अतिरीक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यांचे सनदी सेवेतील पद हे सध्या अतिरीक्त सेक्रटेरी दर्जाचे नाही. त्यांची या पदी बढती झाल्यानंतर त्यांना या पदावर कायम नियुक्ती देण्यात येणार आहे. ईडी प्रमुख पद हे अतिरीक्त सचिव दर्जाचे पद आहे त्यामुळे त्यांची या पदावरील सध्याची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपातील असली तरी तीन महिन्यांनंतर त्यांना या पदी कायम केले जाईल. ईडी कडे सध्या मनि लॉंड्रिग आणि फेमा कायद्याचा भंग करण्यात आल्याची अनेक महत्वाची प्रकरणे आहेत त्यामुळे हे पद संवेदनशील पद मानले जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)