ईडन गार्डनवरील कामगारांच्या वेतनात वाढ करण्यात येणार 

कोलकाता – कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. मात्र कोलकात्याचे घरचे मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईडन गार्डन स्टेडियमच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. अकराव्या हंगामातील सर्वोत्कृष्ट मैदान हा पुरस्कार ईडन गार्डन मैदानाला देण्यात आला आहे. त्यामुळे तेथील कामगारांच्या मानधानात वाढ करण्याचा निर्णय बंगाल क्रिकेट संघटनेने घेतला आहे.

तसेच या कामगारांना नियमित सेवेत रुजू करून घेण्यात येणार आहे. ही वेतनवाढ किती असणार आहे, याबाबत बोलताना संघटनेचे सहसचिव अविषेक दालमिया म्हणाले की, त्यांना त्यांच्या वेतनश्रेणीपेक्षा जास्तच वाढ मिळणार असून त्यांच्यासाठी ही वाढ उत्साहवर्धक असणार आहे. प्रत्येकाला आपल्या नोकरीच्या सुरक्षिततेची काळजी असते. त्याच्यावर त्यांच्या भविष्यातील अनेक गोष्टी अवलंबून असतात. या सर्वांचा विचार करूनच आम्ही ही वेतनवाढ केली. तसेच त्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याचाही निर्णय घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सॉल्ट लेक स्टेडियममधील ग्राऊंड्‌समन, तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढ देण्यात येणार आहे, असे सांगून दालमिया म्हणाले की, आम्ही आमच्या दुमुर्जला येथील नव्या स्टेडियमच्या निर्मितीसाठी 20 कोटी रुपयांची व्यवस्था केली असून लवकरच तेथील स्टेडियमच्या कामाला सुरूवात करण्यात येईल. बंगाल संघटनेचे मुख्य क्‍यूरेटर सुजन मुखर्जी यांनी ईडन गार्डनला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आनंद वाटत असून या पुरस्कारासाठी हे स्टेडियम पात्र असल्याचा विश्‍वासही व्यक्‍त केला.

दरम्यान, अकराव्या हंगामातील प्ले-ऑफ फेरीचे दोन सामने पुण्यातील गहुंजे मैदानाऐवजी कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले होते. अखेरच्या क्षणी हा निर्णय होऊनही बंगाल क्रिकेट संघटनेने ईडन गार्डन मैदानावर यशस्वीपणे दोन्ही सामन्यांचे आयोजन केले होते. त्यामुळे गांगुलीने आपल्या ट्‌विटमध्ये ईडन गार्डन स्टेडियमवरील सर्व कर्मचाऱ्यांचे खास आभार मानले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)