इ-ग्राम राज्यस्तरीय समिती सदस्यपदी ग्रामसेवक संदीप लगड यांची निवड

श्रीगोंदा – राज्य सरकारच्या इ-ग्राम राज्यस्तरीय पेपरलेस समितीच्या सदस्यपदी श्रीगोंदा तालुक्‍यातील उक्कडगाव येथील ग्रामसेवक संदीप लगड यांची विभागातून निवड करण्यात आली आहे.
राज्यातील ग्रामपंचायती पेपरलेस करण्याबाबत अभ्यास करून इ-ग्राम सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये किंवा आवश्‍यकता भासल्यास संबंधित कायद्यात सुधारणा सुचविण्याबाबत राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली. या समितीमध्ये नाशिक विभागातून श्रीगोंदा तालुक्‍यातील उक्‍कडगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संदीप लगड यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील ग्रामपंचायती कागद विरहित करण्यासंदर्भात ग्राम सॉफ्ट प्रणाली राज्यात लागू करण्यात आली आहे. 1 एप्रिल पासून राज्यातील सर्व ग्रामपंचायती कागदविरहित करण्यात येत आहेत. ग्रामपंचायती पेपरलेस करण्याबाबत अभ्यास करून या प्रणालीमध्ये सुधारणा सुचवणे असल्याने राज्यातील ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी 9922447066 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन लगड यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)