इहसान डोग्रामकी फॅमिली हेल्थ फाऊंडेशनचा पुरस्कार डॉ. विनोद पॉल यांना

नवी दिल्ली – नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पाल यांची प्रतिष्ठेच्या इहसान डोग्रामकी फॅमिली हेल्थ फाऊंडेशनच्या पुरस्कारासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून निवड झाली आहे. हा जागतिक सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय असून कौटुंबिक आरोग्य क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या 27 जानेवारीला झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मे 2018 मध्ये स्विर्त्सलंडमध्ये जिनिव्हा येथे होणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यक्रमात डॉ. पॉल यांना हा पुरस्कार औपचारिकरित्या प्रदान केला जाईल.

डॉ. पॉल हे कौटुंबिक आरोग्य क्षेत्रात विशेषत: नवजात शिशू आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करणारे आंतरराष्ट्रीय विख्यात संशोधक, असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मंडळाच्या ठरावात म्हटले आहे.

-Ads-

महिला, बालके, आणि किशोरांच्या आरोग्यविषयक मुद्दयांसह विविध विषयांवर डॉ. पॉल यांचे अनेक लेख प्रसिध्द झाले आहेत. बालरोगविषयक पुस्तकाचा भारतात आणि इतर अनेक देशात वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या पाठयक्रमात समावेश करण्यात आला आहे. भारतात राष्ट्रीय बाल आरोग्य मार्गदर्शक तत्वे आणि कार्यक्रम आखण्यात डॉ. पॉल यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)