इस्रो करणार 31 उपग्रहांचे एकाच मोहिमेत प्रक्षेपण

बंगळूरु- एकाच मोहिमेत 104 उपग्रहांचे प्रक्षेपण करून जागतिक विक्रम करणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता एकाच मोहिमेत 31 उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. त्यामध्ये कॅट्रोसॅट-2 या स्वदेशी बनावटीच्या उपग्रहांच्या मालिकेतील एका उपग्रहाचा समावेश असणार आहे.

इस्रोने ऑगस्टमध्ये “आयआरएनएसएस-1एच’ या दिशादर्शक उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. मात्र, या अपयशामुळे इस्रोचे शास्त्रज्ञ खचून न जाता त्यांनी आणखी एक महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत एकाच वेळी 31 उपग्रह अंतराळ कक्षेत सोडण्यात येणार आहेत.

10 जानेवारी रोजी हे प्रक्षेपण करण्यात येणार असून या मोहिमेत कॅट्रोसॅट-2 या मालिकेतील मुख्य उपग्रह असेल. या मोहिमेसंदर्भात इस्रोची आढावा समिती लवकरच बैठक घेणार असून त्यामध्ये या मोहिमेबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितले.

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रातून पीएसएलव्ही-40 या प्रक्षेपकाच्या साह्याने या उपग्रहांचे प्रक्षेपण होणार आहे. या मोहिमेत फिनलंड आणि अमेरिकेचे 28 नॅनो उपग्रह, भारताचा एक लघु व एक नॅनो उपग्रह आणि कॅट्रोसॅट हा मुख्य उपग्रह, असे एकूण 31 उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)