‘इस्रो’च्या सर्वात हलक्‍या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोटा – “इस्रो’च्या “पीएसएलव्ही व्ही सी 44′ चे सतिश धवन अंतराळ केंद्रातून आज रात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या अंतराळ यानाबरोबर “मायक्रोसॅट- आर’ आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेला “कलामसॅट’ हा उपग्रहदेखील अंतराळात सोडण्यात आला आहे. एकूण 28 तासांच्या “काऊंटडाऊन’नंतर रात्री 11 वाजून 37 मिनिटांनी हा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला.

‘इस्रो’कडून 2019 साली सोडण्यात आलेला पहिला उपग्रह असलेला “मायक्रोसॅट आर’ हा 740 किलो वजनाचा उपग्रह लष्क़री कारणासाठी कार्यरत असणार आहे. प्रक्षेपणानंतर 14 मिनिटांनी पृथ्वीपासून 274 किलोमीटर उंचीवर तो स्थिरावला.”कलामसॅट’ हा 10 सेंमी आकाराचा आणि 1.2 किलो वजनाचा सर्वात कमी वजनाचा उपग्रह प्रयोगांसाठी कार्यरत असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)