नवी दिल्ली – भारताचा सर्वात अवजड उपग्रह असलेला GSAT-11 चे रात्री यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. युरोपियन स्पेस एजन्सी, फ्रेंच गुयाना येथून GSAT-11 ने अवकाशाकडे यशस्वी झेप घेतली. कम्युनिकेशन उपग्रह असलेल्या GSAT-11 मुळे भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे.
तब्बल 5,854 किलो इतके वजन असलेला “जीसॅट-11′ हा “इस्रो’चा सर्वाधिक वजनदार उपग्रह आहे. “इस्रो’च्या 1-6 के बसवर “जीसॅट-11′ उपग्रहाची बांधणी करण्यात आली असून त्याचा कार्यकाळ 15 वर्षे इतका असणार आहे. हा उपग्रह प्राथमिक पातळीवर भूपृष्ठीय पर्यावरण कक्षेमध्ये प्रस्थापित करण्यात येणार आहे. नंतर तो “लिक्वीड अपोजी मोटर’च्या सहाय्याने पृथ्वीच्या पर्यावरण कक्षेबाहेर अंतराळात स्थिर केला जाईल. या उपग्रहाचे प्रक्षेपण 25 मे रोजी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र अतिरिक्त तांत्रिक तपासण्यांची गरज भासल्याने हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले.
A major milestone for our space programme.
Kudos👏👏 to @isroIndia’s heaviest communication satellite #GSAT11🚀 launched successfully from #FrenchGuiana.
➡️ https://t.co/5k6woZxfVl pic.twitter.com/k0AdGGyeNg
— PIB India (@PIB_India) December 5, 2018
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा