इस्रोच्या ‘जीएसएटी- 6 ए’चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोटा- भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात “इस्रो’च्या अत्याधुनिक “जीएसएटी-6ए’ या दूरसंचार उपग्रहाचे आज सायंकाळी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. “जीएसएलव्ही- एफ08′ या उपग्रहवाहकावरून प्रक्षेपित झालेला उपग्रह अंतराळामध्ये नियोजित जागी स्थिरस्थावर झाला आहे. या रॉकेटला संपूर्ण भारतीय बनावटीचे तिसऱ्या टप्प्यातील क्रायोजेनिक इंजिन जोडलेले होते. सतिश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण झाल्यापासून 18 मिनिटांनी हा उपग्रह अंतराळ कक्षेमध्ये स्थिरस्थावर झला.

या उपग्रहाच्या माध्यमातून मोबाईल कम्युनिकेशनसाठी अधिक व्यापक कव्हरेजवर अधिक भर दिला जाणार आहे, असे “इस्रो’च्यावतीने सांगण्यात आले. “इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी हे प्रक्षेपण यशस्वी झाल्याचे सांगून सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. “जीएसएलव्ही’ उपग्रहवाहकावरून प्रक्षेपित करण्यात आलेला हा 12 वा उपग्रह होता. तर वरिष्ठ टप्प्यातील भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिकचा वापर असलेला सहावा उप्ग्रह आहे. हा उपग्रह बनवण्यासाठी सुमारे 10 वर्षांचा कालावधी लागला होता, असे “इस्रो’ने सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)