इस्रोच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 

श्रीहरीकोटा: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात “इस्रो’ने आज “जीसॅट-29′ हा अत्याधुनिनिक संवाद यंत्रणा असलेला उपग्रह अवकाशामध्ये यशस्वीपणे सोडला. श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून “जीएसएलव्ही मार्क- 3′ या उपग्रहवाहकातून या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहाचे “काऊंट डाऊन’ मंगळवारी दुपारी 2.50 वाजता सुरू झाले होते. आज संध्याकाळी 5 वाजून 8 मिनिटांनी या उपग्रहाचे नियोजनानुसार प्रक्षेपण झाले.
तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने येत असलेल्या “गाजा’ या चक्रिवादळामुळे या उपग्रहाच्या प्रक्षेपणामध्ये काही अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्‍त व्यक्‍त केली जात होती. मात्र तसा कोणताही अडथळा न येता उपग्रहाचे प्रक्षेपण निर्विघ्नपणे झाले.
श्रीहरीकोटा येथून झालेले हे 67 वे प्रक्षेपण होते. तर “जी सॅट -29′ हा भारताने तयार केलेला 33 वा संवाद उपग्रह आहे. या उपग्रहाचे वजन 3,423 किलो आहे. तर या उपग्रहाच्या माध्यमातून जम्मू काश्‍मीर आणि ईशान्य भारतात इंटरनेट सेवा पुरवली जाऊ शकणार आहे, असे “इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले. “इस्रो’कडून प्रथमच चाचणी घेतली जात असलेली लेजर आधारीत ऑप्टिकल कम्युनिकेशन यंत्रणाही या उपग्रहावर बसवलेली आहे. या उपग्रहाला वाहून नेणाऱ्या “जीएसएलव्ही मार्क- 3′ चे वजन 641 टन आणि उंची 43 मीटर इतकी आहे.
या रॉकेटची निर्मिती करण्यासाठी 15 वर्षांचा काळ लागला आणि त्यातील प्रत्येक प्रक्षेपणासाठी 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. “जी सॅट-29′ चे प्रक्षेपण यशस्वी झाल्याने “जीएसएलव्ही मार्क-3′ वापरयोग्य घोषित केले जाणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या “चांद्रयान-2′ आणि 2022 साली होणाऱ्या “गगनयान’साठीही “जीएसएलव्ही-मार्क 3’चा उपयोग केला जाणार आहे. 4 टन वजनाचे उपग्रह अंतराळ सोडू शकण्याची क्षमता त्यामुळे भारताला प्राप्त होईल आणि अंतराळ क्षेत्रातील आघाडीच्या देशांच्या रांगेत भारताला स्थान मिळेल.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)