‘इस्रो’ची लष्कराला मदत ; दळणवळणासाठी उपग्रहाची करणार निर्मिती

नवी दिल्ली : भारताची आघाडीची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ भारतीय लष्कराला मोठी मदत करणार आहे. या मदतीतून इस्रो लष्करासाठी दळणवळण आणि टेहळणी उपग्रह बनवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठीचे काम वेगाने सुरु करण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये हे उपग्रह अवकाशात सोडले जाणार असल्याचेही म्हटले जात आहे.

सध्या इस्रोने चांद्रयान-2 मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात ते सोडले जाणार आहे. त्याआधी इस्रो लष्करासाठी उपग्रह बनवत आहे. हा उपग्रह सामरिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे भारतीय लष्कराला एक नवीन ‘डोळा’च प्राप्त होणार आहे. इस्रो जीसॅट 7 उपग्रह सप्टेंबरमध्ये सोडणार असून भारतीय हवाई दलाला हा उपग्रह अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर याच वर्षाच्या अखेरीस रिसॅट-2ए या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. हा उपग्रह दळणवळणासाठी उपयुक्त ठरणार आहे. हा उपग्रह जीएसएलव्ही एमके-2 या रॉकेट लाँचरच्या मदतीने सोडला जाणार आहे. वायुसेनेला याचा रडार यंत्रणेकरता मोलाचा उपयोग होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)