इस्रायलने गाझातील हमासचे टीव्ही स्टेशन केले उध्वस्त 

गाझा शहर,(गाझा) – सोमवारी संध्याकाळी इस्रायलने गाझातील हमास टीव्ही स्टेशन अल अक्‍सा उध्वस्त केले आहे. इस्रायलच्या हवाई दलाने अल अक्‍सा टीव्ही इमारतीवर अनेक प्रक्षेपास्त्रे सोडून ती उध्वस्त केली. मात्र अल अक्‍सा टीव्ही इमारत उध्वस्त करण्यापूर्वी इस्रायली हवाई दलाने ती इमारत निर्मनुष्य करण्यासाठी “वॉर्निंग मिसाईल’ सोडले होते. त्यामुळे अल अक्‍सा टीव्हीने आपले प्रक्षेपण बंद करून इमारत त्वरित निर्मनुष्य केली.

इस्रायली हवाई दलाने पाठोपाठ केलेल्या हल्ल्यात ती जमीनदोस्त झाल्याचे आयडीएफने म्हटले आहे. मात्र या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्याचे वृत्त नाही. हमास दहशतवादी गटाने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझावर हल्ला केला. तत्पूर्वी गाझातील दहशतवाद्यांनी इस्रायलवर 300 क्षेपणास्त्रे सोडली होती. त्यामुळे अनेक निवासी घरे ध्वस्त झाली. या हल्ल्यांमध्ये एक नागरिक मरण पावल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्युत्तरात इस्रायलने अल अक्‍सासह गाझातील अनेक ठिकाणांवर हल्ले केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)