इस्राएलच्या प्रवाशाला नेण्यास कुवैत एअरवेजचा नकार

रियाध – इस्राएलच्या प्रवाशाला विमानातून नेण्यास कुवैत एअरवेजने नकार दिल्यामुळे जर्मनीत वादळ उठले आहे. या विमान कंपनीवर बंदी आणण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

ही घटना दोन वर्षांपूर्वी, 2016 साली, घडली होती. त्यावेळी फ्रॅंकफर्टहून एक प्रवासी थायलंडला जात होता. या विमानाचा एक थांब कुवैतमध्ये होता. मात्र या व्यक्तीचे राष्ट्रीयत्व कळाल्यानंतर कंपनीने त्याची बुकिंग रद्द केली. कुवैतमधील1964 च्या कायद्यानुसार हा निर्णय घेण्यात आला होता. या कायद्यानुसार कुवैती कंपन्या आणि इस्राएली नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यवहार होऊ शकत नाहीत.

या प्रवाशाने फ्रॅंकफर्टमधील न्यायालयात खटला दाखल केला होता. मात्र नोव्हेंबर 2017 मध्ये न्यायालयाने कुवैत एअरलाइन्सचा निर्णय योग्य ठरवला होता.

जर्मनीचे केंद्रीय परिवहन मंत्री आंड्रियास शाऊएर यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की सरकारने इस्राएलच्या प्रवाशाला नाकारल्याबद्दल कुवैत एअरवेजवर राजकीय दबाव आणायला हवा. जर्मन सरकार या विषयावर कुवैती अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहे. कुवैत एअरवेजने इस्राएलच्या प्रवाशांना जर्मन परिक्षेत्रात प्रवेश करण्यास नकार दिला तर फ्रॅंकफर्ट एअरपोर्टने या एअरलाइनसाठी आपले लॅंडिंग स्लॉट रद्द करावेत, अशी मागणी फ्री डेमोक्रेटिक पार्टी (एफडीपी) पक्षाचे संसद सदस्य ऑलिव्हर लुक्‍सिक यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)