सर्वोच्च न्यायालयाने दिला 50 लाखांच्या भरपाईचा आदेश
नवी दिल्ली – इस्त्रो म्हणजेच भारतीय अंतरीक्ष संस्थेचे माजी वैज्ञानिक नांबी नारायणन यांना हेरगीरीच्या आरोपाखाली विनाकारण अटक करून त्यांचा छळ केला गेला असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला असून या प्रकरणात त्यांना 50 लाख रूपयांची नुकसान भरपाई दिली जावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 1994 सालचे हे प्रकरण असून त्यांना केरळ पोलिसांनी अटक केली होती.

हेरगीरीच्या प्रकरणात नारायणन यांना अटक केल्याप्रकरणी त्यांनी केरळचे पोलिस महासंचालक दोन निवृत्त पोलिस अधिक्षकांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. सीबीआयनेही या प्रकरणाची चौकशी केली त्यात पोलिसांनी वैज्ञानिकांवर केलेली कारवाई आणि त्यांची अटक अनावश्‍यक असल्याचे म्हटले होते.

त्यानंतर नारायणन यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही धाव घेऊन राज्य सरकारकडून आपल्याला आपल्या मानसिक छळाबद्दल नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली होती. ती मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)