इस्त्रायल-पॅलेस्टाईन शांततेसाठी संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांचा पुढाकार

जेरूसलेम – संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अन्तोनिओ गुटेर्स यांनी इस्त्रायल पॅलेस्टाईन संघर्षात समझोता घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच उद्देशाने ते आपल्या पहिल्या इस्त्रायल दौऱ्यावर दाखल झाले असून आज त्यांनी येथे इस्त्रायली नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.

दोन्ही बाजूंनी आपसात चर्चेची प्रक्रिया सुरू करावी असा आग्रह त्यांनी यावेळी इस्त्रायली नेत्यांकडे धरला. गेली अनेक वर्षे प्रलंबीत असलेला हा प्रश्‍न आपसातील चर्चेनेच अधिक लवकर सुटू शकेल त्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारीही संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांनी दर्शवली आहे.

गुटेर्स यांनी आज पंतप्रधान बेंजामीन नेतानयाहू यांच्याशी चर्चा केली ते येत्या बुधवारी पॅलेस्टाईनचे पंतप्रधान रामी हमादल्लाह यांच्याशी चर्चा करणार आहेत. पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमुद अब्बास हे सध्या तुर्कीच्या भेटीवर असल्याने त्यांची संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांशी भेट होऊ शकणार नाही. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील शांती प्रक्रिया एप्रिल 2014 पासून थंडावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)