इस्त्रायली पंतप्रधानांची पुन्हा चौकशी

जेरूसलेम: इस्त्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेतानयाहु यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असून या आरोपावरून तेथील पोलिसांनी आज त्यांची चौकशी केली. या प्रकरणात त्यांची चौकशी केली जाण्याचा हा 12 वा प्रकार आहे. तपास पथक पंतप्रधानांच्या निवासस्थानी आले त्यावेळी त्यांच्या बंगल्याच्या बाहेर नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे एकूण दोन गुन्हे आहेत. त्यात एका प्रकरणात त्यांनी सरकारी निर्णयासाठी अब्जाधिशांकडून मोठ्या प्रमाणात भेटी स्वीकारल्याचा आरोप आहे.

 

-Ads-

त्यांची या प्रकरणात गेल्या ऑगस्ट महिन्यातही चौकशी करण्यात आली होती. तथापी आपण कोणत्याही गैरप्रकारात सहभागी नसल्याचा खुलासा नेतानयाहू यांनी या आधीच केला आहे. प्रसार माध्यमांनी आपल्या विरोधात बदनामीची मोहीमच आखली असून त्यातून हे गुन्हे नोंदवले गेले असावेत अशी त्यांची तक्रार आहे. तथापी आपण चौकशीला पुर्ण सहकार्य करीत आहोत असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)