इस्त्रायच्या हल्ल्यात पॅलेस्टाईन मधील सहा ठार 

गाझापट्टी: गाझा आणि इस्त्रायलच्या सीमा भागात इस्त्रायलने पॅलेस्टाईन हद्दीत हल्ला चढवला त्यात पॅलेस्टाईनच्या हद्दीतील सहा जण ठार झाल्याचे वृत्त आहे. गाझ्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की या हल्ल्यात एके ठिकाणी एकूण चार जण ठार झाले.
पॅलेस्टाईच्या हद्दीतील एक गट कुंपणाची सीमा तोडून इस्त्रायलच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करीत असता त्या जमावावर इस्त्रायली जवानांनी गोळीबार केला. त्यात चार जर ठार झाले तर अन्य काही जण जखमी झाले. या गोळीबाराच्या निषेधार्ध काहीं पॅलेस्टाईन नागरीकांनी सीमेनजिक जोरदार निदर्शने केली त्यावेळीही त्यांचा इस्त्रायली जवानांशी वाद झाल्यानंतरही या जवानांनी तेथे गोळीबार केला त्यात दोन निदर्शक ठार झाले तर अन्य 140 निदर्शक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेच्या संबंधात माहिती देताना इस्त्रायली सूत्रांनी सांगितले की सुमारे चौदाशे इस्त्रायली नागरीकांचा एक जथ्या सीमा ओलांडून आमच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना रोखण्यासाठी हा गोळीबार करावा लागला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)