इसिसशी संबंधित दोघांना अटक

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली/ हैद्राबाद- “इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित दोघा जणांना राष्ट्रीय तपास संस्थेने हैद्राबादमधून अटक केली. भारतीय तरुणांना कट्टरवादी गटांमध्ये ओढून देशात दहशतवादी घातपाती कृत्ये करण्याच्या कारस्थानाचा तपास “एनआयए’कडून केला जातो आहे. त्याच तपासांतर्गत दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.

हैद्राबादेतील मोहम्मद अब्दुल्लाह बसित (वय 24) आणि मोहम्मद अब्दुल कादिर (वय 19) अशी या दोघांची नावे आहेत. इसिसची विचारसरणी पसरवणे आणि दहशतवादी कृत्ये घडवण्याच्या कारस्थानाबाबतची माहिती मिळवण्यासाठी या दोघांना अटक करण्यात आली आहे, असे “एनआयए’च्या प्रवक्‍त्याने सांगितले.

-Ads-

इसिसचे सदस्य देशातील काही महत्वाची ठिकाणे हेरणे, तरुणांना भडकावणे, जिहादी कार्यासाठी प्रशिक्षण देऊन घातपाती कारवाया करत आहेत का, याबाबत “एनआयए’कडून 2016 पासून तपास सुरू आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयात दोषी ठरवून 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर आदन हसन या अन्य एका तरुणाविरोधातील खटला सुरू आहे.

याप्रकरणी अधिक तपास केला असता खात्रीशीर सूत्रांकडून बसितबाबत अधिक माहिती उपलब्ध झाली. बसित आणि अन्य काही सहकारी इसिसच्या कारवाया वाढवण्याच्या कटात सहभागी असल्याचे समजले. त्यानुसार “एनआयए’ने 6 ऑगस्ट रोजी 7 ठिकाणी छापे घातले होते. तेथून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले. हे सर्व साहित्य हैद्राबादमधील “सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅब’मध्ये पाठवून देण्यात आले आहे.

प्राथमिक चौकशीदरम्यान अब्दुल बसित, मोहमद अब्दुल कादिर आणि अन्य एकाने आपल्यावरील आरोप मान्य केले आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)