“इसिस’शी संबंधित आणखी एकाला मुंब्य्रातून अटक

मुंबई – “इसिस’शी संबंधित आणखी एकाला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी ठाणे जिल्ह्याजवळील मुंब्रा येथून अटक केली. विषारी रसायनांच्या वापराने सामूहिक हिंसा घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या “इसिस’ शी संबंधित गटाशी त्याचा संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या व्यक्‍तीकडील लॅपटॉप, टॅबलेट कॉम्प्युटर, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्हर, राउटर, मोबाईल फोन आणि डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

“एटीएस’ने यापूर्वी 21 आणि 22 जानेवारीला ठिकठिकाणी छापे घातले. त्यानंतर औरंगाबाद आणि ठाण्यामधून 8 जणांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतले आहे. या सर्वांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 120 ब (गुन्हेगारी कारस्थान) आणि प्रतिबंधित कृत्ये बंदी कायद्याच्या विविध कलमे आणि बॉम्बे पोलिस कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या सर्वांच्या चौकशीमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे शनिवारी एकास अटक केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)