इसिसमध्ये सामील झालेल्या केरळमधील चौघांचा मृत्यू?

संग्रहित छायाचित्र

एकाच कुटूंबातील तिघांचा समावेश
थिरूवनंतपूरम्‌ – इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या खतरनाक दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचा संशय असलेल्या केरळमधील चौघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांचा मुलाचा समावेश आहे.
शिहास, त्याची पत्नी अजमला, त्यांचा मुलगा आणि मुहम्मद मनसद अशी मृतांची नावे आहेत. ते केरळच्या कासरगोड जिल्ह्याचे रहिवासी होते.

ते चौघे मृत्युमुखी पडल्याचा संदेश त्यांच्या एका नातलगाला मिळाला. मात्र, त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याविषयीचा तपशील मिळू शकलेला नाही. त्यांच्या मृत्यूचा संदेश तीन दिवसांपूर्वी मिळाल्याच्या वृत्ताला पोलिसांकडूनही दुजोरा देण्यात आला. केरळमधील 21 जण 2016 मध्ये बेपत्ता झाले. नंतर ते इसिसमध्ये सामील झाल्याची माहिती पुढे आली. इसिसमध्ये सामील झालेल्यांत चार महिला आणि तीन बालकांचा समावेश होता.

बेपत्ता झालेले सर्वजण केरळमधून सीरिया आणि अफगाणिस्तानात दाखल झाले. नंतर ते दहशतवादी अड्ड्यांवर पोहचल्याचे समजते. इसिसमध्ये सामील झालेल्यांपैकी सतरा जण कासरगोडचे तर उर्वरित पलक्कड जिल्ह्याचे रहिवासी आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)