इसिस’ने अफगाणिस्तानात तीन भावंडांचा केला शिरच्छेद

संग्रहित छायाचित्र

काबूल (अफगाणिस्तान) – इसिसच्या दहशतवाद्यांनी अफगणिस्तानात तीन भावंडांचा शिरच्छेद केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे तिघेही भाऊ वैद्यकीय व्यवसायातील होते. पूर्व अफगाणिस्तानातील नांगरहर प्रांतात ही घटना नोंदवण्यात आली आहे. इसिसचा बालेकिल्ला असलेल्या चपरहार जिल्ह्यात शनिवारी रात्री चपरहार जिल्ह्यात इसिसच्या दहशतवाद्यांनी निसार तरेलीवाल (27), नयीम तरेलीवाल (24) आणि अब्दुल वाहब (19) या तीन भावांची गळा चिरून हत्या केली. यापैकी निसार हा डॉक्‍टर होता. मधला भाऊ नयीम हा व्हॅक्‍सिन कॅंपेनर होता आणि धाकटा अब्दुल वाहब हा मेडिकल स्टुडंट होता अशी माहिती नांगरहारच्या राज्यपालांचे प्रवक्ते अत्ताउल्ला खोग्यानी यांनी दिली आहे.

या तीन भावंडांचे वडील यांचाही इसिस दहशतवाद्यांनी गेल्या वर्षी शिरच्छेद केला होता. ते हे डॉक्‍टर होते असे अत्ताउल्ला खोग्यांनी यांनी सांगितले आहे. लोकाचे असे शिरच्छेद करण्याच्या घटना या भागात नेहमीच होत असतात. वेगवेगळ्या घटनांमध्ये इसिस दहशतवाद्यांनी रोदात जिल्ह्यातून 11 शेतकऱ्यांचे अपहरण केले आहे. हे शेतकरी आपल्या शेतात काम करत असताना त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यापैकी दोन जणांची नंतर सुटका करण्यात आली असल्याची माहिती नांगरहार कौन्सिलचे उपाध्यक्ष लाल मोहम्मद दुराणी यांनी दिली आहे.

अफगाणिस्तानमध्ये खसकशीचे (पॉपी) उत्पादन प्रचंड प्रमाणावर होते. त्यापासून तयार केलेली अफू हे जगातील हेरोईन बनवण्याचा मुख्य स्रोत (सुमारे 9,000 टन) असल्याची माहिती यूएनओडीसी (यू.एन. ड्रग्ज अँड क्राईम) कार्यालयाने गेल्या वर्षी दिली होती. या ड्रग्जमुळे गेली अनेक दशके अफगाणिस्तानमधील सुरक्षितता, हिंसाचार आणि घूसखोरीला चालना मिळालेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)